Monday, 31 March 2014

युनीकोड ते साउंडकोड – लेख 38 – मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला संजीवनी देणारे संशोधन



युनीकोड ते साउंडकोड लेख 38 –
मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला संजीवनी देणारे संशोधन

(नावे सोडुन लेखनातील अक्षरांत एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयम झीडकारले आहेत)

उद्देश –
मोडीच्या करोडो करोडो पानापानातुन दडलेल्या भारताच्या इतीहासाला देवनागरीतुन प्रकाशीत करणे.

स्पष्टीकरणासह गृहीते –
1) मोडी-लीपीतुन लीहीलेल्या करोडो करोडो पानांत दडलेला अर्थ भारताला अजुनही प्रकाशीत करता आला नाही.
2) मोडी-लीपी वाचता येणार्‍या व्यक्तींची संख्या आत्ताच्या एकुण भारतीय लोकसंख्येच्या व्यापात ''कच्छच्या वाळवंटात बादलीभर पाणी'' एवढी ठरते!
3) इतीहासाच्या करोडो करोडो पानोपानी दडलेले संपुर्ण मोडीतील साहीत्य व पत्रव्यवहार, मोडी वाचता येणार्‍या तुरकळ व्यक्तींच्या हातुन, देवनागरी-मराठीत आणणे हा पुढील दोन-हजार वर्षांचा कालावधी ठरु शकेल ! ! म्हणजे भुतकाळात घडलेल्या इतिहासापेक्षा दुप्पट वेळ तो प्रकाशीत करण्यात लागेल ! ! !
4) कदाचीत आजपर्यंत संग्रह केलेली, जपुन ठेवलेली ही करोडो करोडो मोडी-लीपीतील ऐतीहासीक पाने तोपर्यंत वाळवीने खालेल्ली असतील, कचर्‍यात टाकुन दीली जातील, वा नष्ट होतील.
5) आजही भारताच्या पातळीवर अत्यंत जलद गतीने मोडी-लीपीत दडलेल्या करोडो करोडो पानांना प्रकाशीत करण्याचे सुत्र कोणालाही गवसलेले नाही.

आजच्या मोडी-लीपीबाबतच्या शीक्षणाचे चुकीचे धोरण –

मोडीच्या शिक्षणाचे क्लासेस भारतात काही ठीकाणी घेतले जातात. भारतभरच्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत ते नगण्य ठरतात. यात शीक्षण घेणार्‍या वीद्यार्थ्यांना मोडी-लीपीच्या ऐतीहासीक पानांचे मराठीतील देवनागरी लेखनात परीवर्तन करण्याचे काम मीळते व त्यातुन त्यांच्या कौटुंबीक आर्थीक गरजा भागवल्या जातात. मोडी-लीपी शिकल्याने त्यांना कोणत्याही बँकेत, कारखान्यात, दुकानात, व्यवसायात, . . . वगैरे नोकरी मीळत नाही, मीळणार नाही.

वयस्कर व नोकरीतुन नीवृत्त झालेल्या व्यक्ती मायमराठीच्या प्रेमापोटी मोडी-शिकायला येतात. यांच्या वयस्कर आयुष्यात शरीर म्हणावे तेवढे साथ देत नाही, त्यामुळे दिवसाकाठीच काय पण आठवठ्यात एखाद दुसरे मोडीतील पान ते मराठीत आणतात. मनात मायमराठीची प्रचंड आस्था व आपुलकी असणे ही एक गोष्ट झाली आणी मोडी-लीपीत दडलेला भारताचा इतीहास लवकरात लवकर प्रकाशीत करणे ही दुसरी गोष्ट झाली.

'मोडी-लीपीत दडलेला भारताचा इतीहास देवनागरीतुन प्रकाशीत करणे' यासाठीची सुरवात 'मोडी-शीक्षणाच्या क्लासेस' मधुन होते असे म्हटले जाते. हे क्लासेस अतीशय तुरळक आहेत व ते आठवड्यातुन एखाद-दुसरा दीवस घेतले जातात. एकुण मोडी-लीपीच्या शीक्षणाला काही महीने लागतात. यातुन जे शिक्षण मीळते त्यातुन तयार झालेल्या विद्यार्थ्यांना त्यानंतर पुन्हा मोडीतील ऐतीहासीक पाने वाचणे, त्यातील मराठी उच्चार ओळखणे यात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा क्लासेस मध्ये जाऊन ती अडचण वीचारणे यात पुन्हा काही दीवस जातात. घरी बसुन या अडचणी सोडवता येतील अशी रामबाण योजना अजुन तरी आखता आलेली नाही. जसे 'दातात जरी शुल्लक काही अडकले तरी आपण जसे कासावीस होतो आणी दातातुन ते काढुन टाकल्या शीवाय चैन पडत नाही', तसे अशा मामुली अडचणींमुळे एकुण कार्यात बाधा येते.

मोडी-लीपीतुन लीहीलेला ऐतीहासीक कागद म्हणजे दुर्मीळ अमुल्य ठेवा ठरतो. त्याचे देवनागरीतुन मराठीकरण करताना 'ध'चा 'मा' होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. सामान्य स्वैर लीप्यंतरणासारखे हे काम नसते, हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

'आधी मोडी-लीपी कागदावर लीहायला शीका. कागदावर मोडी लीहायला शिकताना अनेकवेळा जेव्हा अक्षरे कागदावर गीरटवली जातात तेव्हा त्यातील उच्चाराची ओळख शीका', हा आजच्या मोडी-लीपी शिक्षणाचा मुलमंत्र ठरतो. यामुळे बर्‍याच व्यक्ती मायमराठीच्या प्रेमापोटी क्लासेस जॉइन करतात पण काही दीवसातच ते अनुपस्थीत राहु लागतात. कॉलेजात असताना श्रमदान करायला गेलेल्या मुलामुलींचा उत्साह जसा पहीले तास - दोन तास उत्तम टीकतो आणी मग दमले भागलेले तरुण जीव उरलेला दीवस झाडाच्या सावलीत गप्पाटप्पा करण्यात घालवतात तसाच हा प्रकार म्हणता येतो! म्हणजेच 'मोडी-लीपीच्या शीक्षणात आमुलाग्र बदल करण्याची वेळ आली आहे', असे म्हणता येते का?

गेल्या अंदाजे पंधरा वर्षांपासुन मोडी शीकणार्‍या वीद्यार्थ्यांशी आणी याचे क्लासेस घेणार्‍या माननीय व्यक्तींशी संबंध आला. यातील एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकी सर्वजण कागद-पेनाच्याच घोड्यावर स्वार असलेले दीसतात. अत्याधुनीक युगाचा वापर करुन 'मोडी-लीपीचे सर्व शीक्षण संगणकातुन देण्याचा उपक्रम हाताळणे', हे या क्लासेसना शक्य झाले नाही. काही फॉण्टही तयार केले गेले पण त्यांचा वापर केल्याने एकुण कागदावरील कार्याच्या वहीवाटीतल्या बैलगाडी-वेगाला, संगणकीय माध्यमाची जेटची-वेगवान-गती जोपासता आली नाही.

मोडी-लीपीबाबतच्या शीक्षणाच्या अत्याधुनीक पद्धतीचे बीजावरोपण –


आजमीतीस मोडी-लीपीच्या शीक्षणात कार्यरत असणार्‍या व्यक्तींना दोष देण्यापेक्षा त्यांचे हात आधुनीकीकरणातुन सक्षम करता येतील का? हा वीचार मनात घोंघावत होता. बर्‍याच जणांच्या यासाठी भेटी घेतल्या, फोनवरुन चर्चा केल्या.

'मोडी-लीपी कागदावर हातांनी गीरवुन शीकण्याचे धोरण' पुर्णपणे बदलुन त्याऐवजी 'संगणकात केवळ मोडी-टायपींग शिकवण्याचा नावीन्यपुर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात' यश प्राप्त केले.

आपल्याला नक्की काय घडवायचे आहे? हे नक्की करता आले की त्यावरचा उपाय नीर्माण करता येतो.

आपल्याला घडवायचे आहे ते, 'ऐतीहासीक करोडो करोडो कागदपत्रात दडलेल्या मोडी-लीपीतील लेखनाला देवनागरी-मराठीत आणायचे आहे', हे नक्की झाले. याला आपण 'मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' असे सुटसुटीत नाव देउ.

मग त्यासाठी कागदावर अक्षरे गीरवत मोडी-लीपी शिकण्याची गरजच काय? त्यासाठी जर मी घडवलेल्या 'जलद सोप्पी मराठी' या सॉफ्टवेअरमधुन जसे देवनागरी-मराठी सहजसुलभपणे टाइप होते, तसेच इंग्रजीच्या क्वेर्टी-कीबोर्डशी समांतरपणे म्हणजे फोनेटीकली टाइप करुन मोडी-लीपीतील चीन्हे उमटली तर सगळेच प्रश्न नेस्तनाबुत होतात.

अर्थात यासाठी मोडी-लीपीच्या अंतरंगात दडलेल्या मायमराठीचा 'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन, अर्थ' असा सुक्ष्म अभ्यास करावा लागला. आता सांगड घालायची होती, '''मायक्रोसॉफ्टच्या इंग्रजी-मर्यादेतुन होणारा संगणकाचा वावर, क्वेर्टी-कीबोर्डचा मोडीसाठीचा वापर, मोडी-लीपीत दडलेल्या सर्व व्यंजन, स्वर, अक्षरे व जोडाक्षरे यांच्या चीन्हांचा फॉण्ट मधला यथायोग्य अवीष्कार, 'व्यक्ती तीतक्या प्रकृती' या म्हणीप्रमाणे कागदावर अवतरलेल्या भारतभरच्या मोडी हस्तलीखीतांना सुयोग्यपणे प्रमाणबद्ध करणारी फॉण्टची चीन्हे, मोडीतील ज्या अक्षरांत कमालीचे साम्य आहे अशा चिन्हांना त्यांच्या खास वेगळेपणातुन उमटवत त्यातील तटस्थ व भीन्न ओळख प्रस्थापीत करण्याचे कौशल्य, शीरोरेषेतुन साधले जाणारे मोडीचे अनोखेपण, आजच्या देवनागरी-लीपीमुळे मराठी शब्द बघायला लागलेल्या डोळ्यांच्या सवयींची मोडी-लीपीशी नीर्माण केलेली जवळकी, मोडीतुन भाषीक अर्थनीर्मीती देवनागरीतुन आणण्यासाठी योग्य ठरणारी मोडीतील आवश्यक चिन्हे तसेच आजच्या काळासाठी मोडीतील टाळता येणारी चिन्हे (उदाहरण – वीवीध मायन्यासाठीची चीन्हे, 'र' सारख्या चीन्हांतील फर्राटेदारपणातुन साजरे होणारे देखणेपण, . . . वगैरे), अत्याधुनीक युनीकोड पद्धतीचा फॉण्ट तयार करण्यातील साधने व मर्यादा, . . . . अशा असंख्य गोष्टींवर उपाय शोधण्यात गेली पंधरा वर्षे खर्च झाली. पण आता 'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' करण्याची योजना कार्यान्वयीत करण्या इतपत त्याची झेप पुर्ण झाली आहे असे म्हणता येते. कोणताच प्रकल्प शंभर टक्के पुर्ण होत नसतो याची जाणीव ठेऊन, यात काम करणार्‍या व्यक्तींना व इतरांना यातील चांगुलपणा व तृटी सांगता व मांडता येतील आणी त्यातुन याचेच पुढील अधीक आदर्श नमुनेदार प्रकल्पात रुपांतर करता येइल.

'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' –

आत्ता कार्यान्वयीत करत असलेला 'संगणकातुन मोडीचे देवनागरी लीप्यंतरण' याच्याशी संलग्न असले महत्त्वाचे दोन भाग आहेत.
1) संगणकातील मायक्रोसॉफ्टमध्ये वापरता येणारा 'मोडी-लीपीचा युनीकोडचा फॉण्ट'.
2) 'मोडी-लीपीच्या युनीकोड फॉण्टमधुन टाइप केलेल्या मजकुराचा केवळ फॉण्ट बदलला की त्याचे देवनागरी-मराठी-युनीकोड मध्ये आपोआप होणारे लीप्यंतरण.
हे दोन्ही भाग गेली सहा महीने वीवीधतेने तपासुन झाले आहेत.

या दोन भागांपैकी प्रथम सादर करत आहे पहीला भाग 'मोडी-लीपीचा युनीकोडचा फॉण्ट'.

केवळ काही तासात दीलेल्या तक्त्यात बघुन बघुन; मोडीतील स्वर-अक्षरे, व्यंजन-अक्षरे (बाराखडी) आणी जोडाक्षरे; संगणकातुन घर-बसल्या शीकण्याची सोय यातुन मीळते.

या मोडी-लीपीच्या टायपींग शीक्षणाच्या प्रकल्पाचे सहा टप्पे तयार केले आहेत. या टप्पातुन मोडी-लीपीतील चीन्हांच्या फरकाची आखणी उच्चारानुसार लक्षात येते. मोडी-लीपीतुन टाइप करायला, मोडी-लीपीतील त्या त्या अक्षराला दीलेले चीन्ह यात लक्षात ठेवायची मुळीच गरज नाही. आधी मराठीचा उच्चार करा, उच्चाराला टाइप करण्यासाठीच्या अचुक उपाय योजनेचे चार नीयम लक्षात ठेवले की मोडी-लीपी टाईप करता येणार आहे. काय आहे की नाही अत्याधुनीक अभीनव प्रकल्प?

त्यासाठीचे बनवलेले सहा टप्पे पुढीलप्रमाणे आहेत –
1)     मोडीतील स्वर अक्षरे
2)     मोडीतील स्वरांसह व्यंजन अक्षरे
3)     मोडीतील स्वरांसह व्यंजन अक्षरे
4)     मोडीतील उकार अक्षरे
5)     मोडीतील बाराखडी
6)     मोडीतील जोडाक्षरे

यातील मोडी-लीपीच्या संगणकीय शीक्षणाचे पहीले दोन टप्पे 'सर्वसमावेशक मराठी' https://www.facebook.com/groups/togangal/ या फेसबुकवरच्या ग्रुपवर त्यासाठीच्या युनीकोडच्या फॉण्टसह (Modeeleepee-Gangal-001) मोफत प्रकाशीत केले आहेत.

सामान्य शाळेतुन मोडीचे शीक्षण देणारा अभ्यासक्रम कोणत्याही वीद्यापीठाने वा सरकारने स्वीकारलेला नाही. अभ्यासक्रमात कोणत्याही वीद्यापीठातुन वा शाळेतुन राबवता येणारे हे प्रकल्प ठरतात. भारतभरची इतीहास संशोधन केंद्रे, मोडी-लीपीचे शिक्षण देणार्‍या संस्था आणी इतीहासकार यांना हा अभीनव मोफत उपलब्ध केलेला अत्याधुनीक प्रकल्प उपयुक्त ठरे असा वीश्वास वाटतो.

ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी प्रथम मोबाइलवर संपर्क साधावा ही वीनंती.





आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल Shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com

Saturday, 29 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 37 – ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.



युनिकोड ते साऊंडकोड लेख 37 –
ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.

(नावे सोडुन बाकी लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरला आहे)

भाषा कशाला शीकायची? संवाद साधायला. ध्वनी माध्यमातुन आपण मराठी बोलतो. हवेवर ओठांनी लीहीताना (म्हणजे बोलताना) भाषेला कागदी अक्षर-चीन्हांची गरज नसते. जेव्हा भाषेला कागदावर ध्वनी खुणांत उमटावयाचे असते तेव्हा भाषेला अक्षर-चिन्हे स्वीकारावीच लागतात.

मराठी म्हणुन जे जे पुरातन व जुने लेखन अस्तीत्वात आहे ते सारे आहे मोडी-लीपीच्या चीन्हांतुन कागदावर साकारलेले. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आणी त्यांनी भारतात स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याला जाणतो. त्यांनी स्थापन केलेले मराठी साम्राज्य केवळ नीव्वळ व फक्त मोडी-लीपीचा वापर संपुर्ण राज्यकारभारात करत होते.

मराठ्यांचे राज्य भारतात वीस्तृतप्रमाणात पसरले होतो. त्यामुळे भारतातील इतर सर्व राजेरजवाड्यांनीही त्यांच्या कारभारात, व्यवहारात मोडी-लीपीचा वापर केला. आज भारताच्या शेकडो वर्षांच्या इतीहासाची करोडो करोडो ऐतीहासीक पाने मोडीत धुळ खात आणि वाळवींचे भक्ष बनत पडून आहेत. आपल्या भारताचा इतीहास आपल्यालाच माहीत नाही ही आजची परीस्थीती आहे.

इंग्रजांनी प्रींटींग टेक्नॉलॉजी आणली भारतात आणली. भारतात राज्यकारभार सुरु करताना, भारतात आपले पाय रोवताना इंग्रजांना मोडी-लीपीचाच आधार घ्यावा लागला होता. पण प्रींटींगसाठीचे मोडी-लीपीचे ठसे नीर्माण करणे अत्यंत कठीण व कटकटीचे असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी मराठी भाषा कागदी लेखनातुन देवनागरी लीपीतुनही ओळखली व वाचली जाते हे लक्षात आले. देवनागरीचे प्रींटींगसाठीचे ठसे बनवणे अगदी सोपे होते. प्रींटींग केलेल्या मराठी पुस्तकांची सुनामी 1800 ते 1900 साली आली आणी कागदी-देवनागरीची-जगबुडी भारतात घडली. मराठीची शेकडो वर्षांची मोडी परंपरा काही दशकात इतीहास जमा झाली.

त्यातच भर म्हणुन भारतात सुरळीत राज्यकारभार करण्यासाठी इंग्रजी अधीकार्‍यांना मराठी शीकवीण्यासाठी 'पुस्तकी मराठी व्याकरणाची' गरज इंग्रजांना भासली. त्यांनी मराठीतल्या संस्कृत-पंडीतांना बोलावुन मराठीचे पुस्तकी व्याकरण लीहीले. एका बाजुला संस्कृतच्या पाणिनींचे व्याकरण आणी दुसर्‍या बाजुला इंग्रजी व्याकरण घेऊन मराठीच्या व्याकरणाची नीर्मीती करण्यात आली. यात इंग्रजांनी मराठी ही जगातील एकमेव भाषा अशी आहे की की जी गद्यासाठी मोडी-लीपी आणी पद्यासाठी बाळबोध लीपी वापरत आहे, याचा वीचारही केला नाही. त्याहुनही लाजीरवाणे व लांच्छनास्पद म्हणजे ज्या मराठीतल्या संस्कृत-पंडीतांनी मराठीचे पुस्तकी व्याकरण लीहीण्यात भाग घेतला त्यांनीसुद्धा हा वीचार केला नाही. ज्ञानेश्वरांनी मराठीला संस्कृतपासुन अलीप्त असणारी 'सुक्ष्मतेतुन भव्यतेकडे जाणारी', 'अमृताचाया पैजा जींकणारी' असे घोषीत केले आणी इंग्रजांच्या काळात मराठीतल्या संस्कृत-पंडीतांनी चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचे आसुड उगारत, मायमराठीला संस्कृतच्या गोठ्यात पुन्हा एकदा कैद केले. यातुन काय घडले? 'शुद्धलेखन नीयमावलींचे जोखड' नसलेली मराठी-भाषा मोडीतुन शेकडो वर्षे मनसोक्त मुक्त स्वच्छंद नीर्वेधपणे वावरत होती. संस्कृतप्रचुर मराठी व्याकरणकारांनी मराठीला संस्कृतच्या व्याकरणाचे कातडे पांघरले आणी त्यानंतर ओघाने आले 'शुद्धलेखन नीयमावलीचे' संस्कृतच्या कैदखान्यातील नीयम. मराठी या स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभीमानी भाषेला बनवले गेले संस्कृतचे गुलाम.

कायहो, घेताना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आपुलकीने आत्मीयतेने? मग का नाही थोडा वीचार करत मोडीतुन शेकडो वर्षे वावरणार्‍या 'शुद्धलेखन नियामांच्या वाळवीने न पोखरलेल्या' अशा स्वच्छ, नीतळ, सुदृढ, ठणठणीत, मराठमोळीच्या उपजत मुलभुत स्वभावाचा? भारतभरच्या अनेक भाषांना मोडीने हस्त-लेखनाची सहजसुलभता दीली. कोणत्याही भाषेतील कोणीही यावे खुशाल मोडीतुन लीहावे ही आहे मोडीची उज्वल शास्त्रीय बांधणी. हा आहे मराठीचा खराखुरा आत्मसन्मान. त्याऐवजी आपण चुकीच्या पुस्तकी व्याकरणातुन काय साधले? मराठीची मराठीतच केली गेलेली 'तत्सम' व 'तत्भव' अशी फाळणी! आता तरी मराठी म्हणुन मानाने सन्मानाने मराठीला जगवायचे असेल तर प्रत्येक मराठी व्यक्तीने मराठीचे अद्वितीय शास्त्रीय अनोखे देखणेपण जाणावे. मराठी व्याकरण लीहीण्याची सुरवात मराठीच्या गद्यासाठी शेकडो वर्षे वापरल्या गेलेल्या मोडी-लीपी आणी पद्यासाठी शेकडो वर्षे वापरल्या गेलेल्या बालबोध-लीपीतुन होते. का बरे मराठी ही जगातील एकमेव भाषा गद्यासाठी मोडी-लीपी व पद्यासाठी बालबोध-लीपी वापरत होती?, याचा गंधही नसलेल्या व्यक्तींच्या हाती आपण मुर्खपणाने मराठी-व्याकरणाचे हक्क दीले आहेत. आता तरी मराठी समाजाचे डोळे उघडणार का?
मोडी आणी बालबोध यांच्या अभ्यासातुन मराठीचे उपजत मुलभुत अंतरंग सहजतेने कळुन येते आणी नव्या आधुनीक युगातील मराठी भाषेचे खरेखुरे अचुक सुयोग्य व शास्त्रीय व्याकरण घडते.

होय, मराठीला संस्कृत, इंग्रजी वा इतर भाषांसारख्या व्याकरणाची गरज नाही. मराठी लीपीचे अंतरंग 'उच्चार, अक्षर, चिन्हे, लेखन व अर्थ' या पाच गोष्टींच्या संलग्नपणातुन साकारते. याचे शीक्षण घेण्यासाठी 'जडणघडण, व्यवस्थापन आणी व्याकरण' असे तीन टप्पे पाडले आहेत.

मराठीची जडणघडण व मराठीचे व्यवस्थापन असेच का? याची अतीसुक्ष्म शास्त्रीयता जाणण्यासाठी 'व्याकरण' असेल. हे मराठीचे 'व्याकरण', मानवी भाषांच्या जागतीकीकरणात इतर भाषांना फीजीक्स मधल्या साउंडपासुन मानवी भाषेच्या अक्षराची नैसर्गीक नीर्मीतीपर्यंत सहजतेने घेउन जाइल.

'सुक्ष्मतेतुन भव्यतेकडे जाणारी', 'अमृताच्या पैजा जींकणारी' असा ज्ञानेश्वरांनी केलेल्या मायमराठीच्या उल्लेखाचा अनोखा नवा परीचय, प्रत्यय, आदर्श व साक्षात्कार आधुनीक संगणकीय पद्धतीतुन मराठी समाजाला व जगाला कळवुया. ज्ञानेश्वरांच्या मायमराठीच्या स्वप्नांना वैश्वीक स्वरुप प्राप्त करुन देऊया.

त्यासाठी मला हवे आहे तुमचे जमेल-तसे, जमेल-तेवढे योगदान, वैचारीक, आर्थीक व प्रसार-प्रचारात्मक.

तयार असाल तर जरुर संपर्क साधा, मी तुमचाच आहे. लोभ आहेच पण तो संपर्काने वृद्धींगत व्हावा.

‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.



आपला, शुभानन गांगल    मोबाईल – 9833102727   ईमेल – shubhanan.gangal@gmail.com   वेबसाईट - www.gangals.com

Thursday, 13 March 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 32 – IPA च्या मर्यादा, अज्ञान, दोष व अयोग्यता आणी मराठीचे सार्वभौमिकत्व



युनिकोड ते साऊंडकोड लेख 32 – IPA च्या मर्यादा, अज्ञान, दोष व अयोग्यता आणी मराठीचे सार्वभौमिकत्व
(लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत)
IPA चा अभ्यास करून त्यातील वैचारीक भुमीका, व्यवहारात्मक दृष्टीकोन आणी भाषांच्या जागतीकीकरणातील सर्वसमावेशकता यांच्या वीचारातुन खुप तृटी मला दीसल्या आहेत. या लेखातुन या वीषयाला केवळ वाच्यता द्यावी एवढेच घडवत आहे, यातुन हा वीषय खुप वीस्तुत असला तरी त्याची पुर्णता करण्याची नीश्चीत दीशा यातुन स्पष्ट होते.

जगभर अनेक व्यक्तींनी IPA चा अभ्यास करून त्यातील दोष प्रगट केले आहेत. पण यातील बहुतेक लेखामागचे धोरण, शब्दांकन आणी आखणी अशा सर्व गोष्टी 'इंग्रजी भाषेचा' आधार घेऊन वावरते. ज्या भाषेतील ध्वनीबाबतच्या अज्ञानाचे वर्णन केवळ 'चीत्र लीपीपेक्षा थोडी वरचढ भाषा' एवढेच करता येते त्या इंग्रजी भाषेतुनच केलेल्या शब्दांकनाची पोच जास्तीतजास्त ज्या कुंपणापर्यंत जाऊ शकते, तेथपर्यंत पोचण्याची धडपड यातुन दीसते. जगभरच्या अनेक भाषांतील अभ्यासु व्यक्तींनी IPA च्या दोषांची कारणमीमांसा मांडताना पुन्हा इंग्रजीचाच वापर केल्याचे दीसते कारण केवळ इंग्रजीतुनच IPA व्यक्त झालेले आहे.

जगभरातील वीवीध भाषांना मानवाच्या जागतीकीकरणातील सर्वोच्च शास्त्रीय व नैसर्गीक भाषेच्या शोधाचे डोहाळे लागले आहेत. आपापल्या भाषांतील अतृप्तता व दोष सांभाळत वाहणार्‍या त्या त्या प्रदेशातील त्या जणु नद्या ठरतात! गढुळ पाण्यातुन वाहणार्‍या नदीने, डोगरकपारी कातळातुन पाझरणार्‍या झर्‍याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध पाण्याबाबत सांगावे असे काहीसे यातुन घडते!

भाषांच्या अशा नद्या एकत्र येऊन IPA नावाच्या महासागरात जरी मीळाल्या आणी त्या मोठ्या जलाशयात नद्यांची गढुळता नीवळल्यासारखे वाटले तरी त्या महासागराला येणारा खारटपणा 'कधीही न नीस्तरता' येणारा ठरतो. तसेच 125 वर्षे पुर्ण केलेल्या IPA चे झाले आहे.

जगातील सर्व भाषा एकत्र येऊन शोध कशाचा घेत आहेत तर मानवासाठीच्या नैसर्गीक भाषेच्या झर्‍याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध पाण्याचा!, आणी त्याची सुरवात करत आहेत IPA नावाच्या महासागरापासुन! सर्व जागतीक भाषांनी एकत्र येवुन केलेला हा प्रयत्न कीतीही स्तुत्य असला तरी तो फोल ठरला आहे, हे कळायला, मानवाला IPA च्या 125 वर्षाच्या कालावधीची आहुती द्यावी लागली आहे. आपण आपल्या मनात एक मांडणी नक्की करुया की, 'मानवाला जे साध्य करायचे आहे ते नक्की करता येणार आहे'. IPA च्या महासागरातील नौकानयनातुन, वीचारांचा प्रवास, दर्‍याडोंगरातील झर्‍याच्या नीतळ, स्वच्छ व शुद्ध पाण्यापर्यंत, कसा पोचणार? मग यासाठीचा मार्ग कोणता? यासाठीचे मार्गदर्शन कसे मिळेल?

जो झरा डोंगरातील तळ्यात पोचतो, त्या तळातल्या पाण्याला नीतळ, स्वच्छ व शुद्धतेबाबत बोलण्याचा सर्वाधीक, प्रांजळ व प्रामाणीक हक्क असतो. आज मराठी भाषेच्या तळ्यावरील पाण्याच्या पृष्ठभागावर जरी '''अयोग्य चुकीच्या व्याकरणीय पुस्तकांच्या वनस्पती आणी शुद्धलेखन नियमावलीची भरमसाठ वेगाने वाढत जाणारी बांडगुळे फोफावली असली''' तरी त्याखालील 'मराठमोळी' मराठी अजुनही आपले नीतळ, स्वच्छ व कधीही अशुद्ध न होणारे स्वयंभु, उपजत व मुलभुत स्वरुप जपुन आहे.

यासाठी मराठीच्या राजहंसाने बदकांच्या घोळक्यातुन वावरणे सोडले पाहीजे, मराठीच्या कोकीळेने कावळ्याचे घरटे सोडुन भव्यद्वीव्य उत्तुंग क्षीतीजाच्या परीसरात नीळ्या नभीचा पंचम गायला लागले पाहीजे. जागतीक पातळीवर IPA ला जे घडवुन आणायचे आहे, त्यासाठीचा मार्ग मराठी भाषेच्या नैसर्गीकपणातुन व शास्त्रीयतेतुनच सापडणार आहे.

मराठीसाठीच्या मी घेत असलेल्या 'सर्वसमावेशक' भुमीकेतुन, 'मराठीच्या कुटुंबात'च काय घडते आहे?, ते एका उदाहरणातुन व्यक्त करतो. समजा आपल्याला 'श्रद्धा व अंधश्रद्धा' याबाबतची 'सर्वसमावेशक' भुमीका घ्यायची आहे. तर याच्या व्युत्त्पत्तीचे जन्मस्थान ठरणार्‍या 'अस्तीक व नास्तीक'पणापासुन सुरवात होणे गरजेचे ठरते. 'अस्तीक व नास्तीक'पणाचा उगम 'धर्म' या संकल्पनेतुन जोपासला जातो. प्रत्येक व्यक्ती त्या त्या धर्म-वीचारतुन प्रभावीत झालेली असते. त्यामुळे समाजातील 'श्रद्धा व अंधश्रद्धा' याबाबतची 'सर्वसमावेशक' भुमीका कोणालाही पटणार नाही, कारण देवळातील व्यक्तींना ती मुसलमानी वा ख्रीस्ती, मसजीदीतील व्यक्तींना ती हिन्दु वा ख्रीस्ती, आणी चर्च मधील व्यक्तींना मुसलमानी वा हिन्दु वाटेल. 'कृपया यात कोणालाही दुखवायचा कोणताही प्रयत्न नाही' हे लक्षात घ्यावे. खरे म्हटले म्हणजे असे वाक्य लीहीण्याची गरज पडते, यातुनच समाजातील प्रत्येकाच्या वीचारांची बैठक स्पष्ट होते, होय ना?. अगदी हेच 'सर्वसमावेशक मराठी' या माझ्या भुमीकेतुन घडत आहे. समाजातील प्रत्येकाने आपापल्या मनात जपलेल्या, आत्तापर्यंत केलेल्या आयुष्यातील प्रवासाला आणी अनेक वर्ष सत्य म्हणुन मानलेल्या गृहीताला यातुन तडा जातो व म्हणुन जरी वैचारीक पातळीवर 'सर्वसमावेशक मराठी' कीतीही योग्य असली, तरी समाज-रुपी मांजराच्या गळ्यात घंटा कशी बांधणार? हा प्रश्न पडतो. प्रत्येक गट आपापल्या वीचारसरणीचा गुलाम असतो आणी म्हणुन 'सर्वसमावेशक' भुमीका पटली तरी मान्य करण्याची क्षमता व धमक कोणातच नसते, हे मी अनेक वर्षे अनुभवले आहे, अनुभवत आहे. एक संशोधक म्हणुन ही 'सर्वसमावेशक' भुमीका मांडत राहणे, एवढेच मला जमेल तेवढे, करायचा प्रामाणीक प्रयत्न मात्र करत आहे.

'उच्चार, अक्षर, चीन्ह, लेखन व अर्थ' यांची अनोखी एकजुट घडवुन आणण्याचे सामर्थ्य केवळ मराठीत आहे. मराठीने देवनागरी चिन्हांचाच वापर करुन, स्वतःच्या लीपीला 'मराठमोळी' नाव दीले की मराठीचा मराठीपणातुन मराठीसाठीचे मराठमोळेपण आपोआप सीद्ध होणार आहे. आत्ता देवनागरी नावाच्या स्क्रीप्टच्या एकाच ताटात संस्कृत, हीन्दी व मराठी भाषेला उष्टेखरकटे खायला घातले जात आहे. हे सारे इंग्रजी भाषेच्या वीचारसरणीतुन घडले आहे. स्क्रीप्ट म्हणजे लीपी नव्हे हे ज्या भाषेला कळत नाही त्या भाषेच्या आधाराने मानव IPA घडवीण्याची पराकाष्टा करत आहे. हा वीरोधाभास लक्षात घेणे गरजेचे आहे 'मराठमोळी' या नावाने स्वतःचे भीन्न ताट मांडुन त्यात देवनागरीची मराठीला आवश्यक तेवढीच चिन्हे, आपल्या चवीपरीने वाढुन घेण्याची संधी, मराठीला मीळणार आहे आणी यामुळे जागतीकपातळीवर मानवाला सर्वोच्च शास्त्रीय व नैसर्गीक भाषेचा शोध घेण्याची संधी मीळणार आहे.

कोणती तरी 'टींबकटु' नावाची भाषा शोधुन त्यावर प्रयोग करण्यापेक्षा, जी भाषा आजही जगात अधीक बोलणार्‍या भाषेत पंधरावे स्थान पटकावुन आहे त्यावर हे प्रयोग झाले तर? जगभरच्या 'भाषा वैज्ञानीक डॉक्टरांना' (!) मराठी भाषेतील सत्तर कोटी व्यक्तींचे जीते-जागते सजीव नमुने Out Patient Department (OPD) म्हणून वापरता येतील! मराठीतील बोली भाषा, आजवरचे मराठी साहीत्य, वीवीध मराठी लेखनाचे नमुने, काय काय आणी कीती कीती गोष्टी हाताळताना, येणार्‍या अडचणीचा उलगडा यातुन होणार आहे. तसेच मराठीचे आजमीतीस असणारे सर्व प्रश्न पुर्णपणे सोडवायचे श्रेयही आजच्या पीढीला यातुन लाभेल.
खुद्द IPA ने 'सामान्यपणे वीचारले जाणारे प्रश्न' (FAQ) यासाठी दिलेल्या http://www.ipasource.com/faq या लिंकवर IPA बाबतच्या तुमच्या मनातल्या बर्‍याच प्रश्नांना, IPA ने दीलेली उत्तरे मीळतील. पण जगभरच्या वीवीध अभ्यासु समीक्षक, चीकीत्सक आणि टीकाकारांनी मांडलेले जवळजवळ दहा लाख नीबंध, लेख व प्रबंध यातुन IPA च्या मर्यादा, अज्ञान, दोष व अयोग्यता लक्षात येते. अर्थात मानवाने मानवासाठी मानवाकरता घेतलेले हे सारे उपक्रम आहेत, याची सामंजस्याने दखल घेणे गरजेचे आहे. IPA ने ठरवलेली उद्दीष्ट्ये साध्य करता यावीत हाच सर्वांचा एकमेव उद्देश आहे.
संशोधनातुन पुर्ण केलेल्या वीचारांना शब्दांकन देत काही लेख, फेसबुकवरील मर्यादा लक्षात घेऊन पोस्ट करत आहे. ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी जरुर मोबाइलवर संपर्क साधावा.
‘युनीकोड ते साउंडकोड’ याबाबतचे लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण वीकासात वीवीधतेने सहभाग घेण्यासाठी सामील व्हा.

आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल Shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com