Sunday, 27 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 45 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7



युनिकोड ते साऊंडकोड लेख 45 – मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

भाषा आणी त्यासाठीची चीन्हे यांचा उगम हा क्लीष्ट व सुक्ष्म अभ्यासाचा वीषय ठरतो. त्यात आपण जीतके खोलात जाउ तेवढे ''आपण जन्मभर केवळ वीद्यार्थीच राहणार'' याची नीश्चीतता फक्त प्राप्त होते. अभ्यासातुन मीळालेला अनुभव फक्त आपण इतरांशी वाटु शकतो. 'मराठी हाजीर हो ऽऽऽ' या प्रकल्पातुन मी तुमच्याबरोबर चर्चा करत माझे अनुभव मांडत आहे.

आजवर अगणीत व असंख्य व्यक्तींनी याचा शोध घेत आपले आयुष्य खर्च केले. त्यांचे आपण ऋणी राहणार आहोत. 'भाषा आणी त्यासाठीची चीन्हे' यांचा सर्वात जुना उपलब्ध इतीहास बघण्याचा प्रयत्न केला तर आपण '''सर्वात जुनी लीखीत सामुग्री 'सुमेरीयन' ठरते''' इथपर्यंत पोचतो. पंजाब प्रांतातील 'हराप्पा' व सिंध प्रांतातील 'मोहेन जो दडो' येथील उत्खनात दोन प्राचीन नगरांचा शोध लागला. येथे सातशेपेक्षा जास्त मुद्रा सापडल्या. संशोधकांनी त्यांचे 'सांकेतीक चीत्रचीन्हे' असे वर्गीकरण केले.

येथे सापडलेल्या उत्खनात मानवी संस्कृतीचे म्हणण्यापेक्षा मानवाच्या 'सुक्षीतावस्थेचे' अनोखे दर्शन यातुन घडते असे म्हणता येते.

'मोहेन जो दडो'ची माहीती तेथल्या परीसरातील लोकांना परंपरेने पीढ्यानपीढ्या होती. पण त्यातील ऐतीहासीक मुल्ये ओळखण्याचे काम 1922 साली, म्हणजे जवळजवळ तीनहजार सातशे वर्षांच्या प्रचंड कालावधीनंतर, 'रखालदास बंद्योपाध्याय' या Archaeological Survey of India येथे काम करणार्‍या ऑफीसरने केले. आता त्याबाबत मीळालेली नवी माहीती व संशोधन इंटरनेटवर प्रसीद्ध झाले आहे.

समजा आपल्याला चीनी वा जपानी भाषेत लीहीलेल्या मुद्रा सापडल्या असे धरुन चालु. त्याला आपण प्रथमदर्शनी काय म्हणु? अहो, त्याबाबत आपल्याला काहीही माहीत नसल्याने, त्याही आपल्यासाठी 'सांकेतीक चीत्रचीन्हे'च ठरतात नाही का? 'सांकेतीक चीत्रचीन्हे' याचा मला कळलेला अर्थ 'याचा संबंध उच्चाराशी व अर्थाशी निगडीत आहे' असा ठरतो!

याबाबतचे प्रा. लॉडन यांनी केलेले 288 मुद्रांबाबतचे संशोधन प्रसीद्ध आहे. इतरही अनेकांनी याबाबत अभ्यासकरुन मते व्यक्त केली आहेत. आपण केवळ त्यांना काय वाटले ते थोडक्यात जाणु घेउ.

येथे सापडलेली 'सांकेतीक चीत्रचीन्हे' म्हणजे त्याकाळची लीपी होय. त्यातील अक्षरांची ओळख 'पुर्व-इलामाइट'शी जास्त जवळ आणी सुमेरीयन लीपीपासुन थोडी वेगळी आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे ही अक्षर-लीपी ठरते, चीत्र-लीपी नाही, कारण ही लीपी ध्वनीसापेक्ष आहे. त्यात भारतीय भाषा-लीपींच्या संदर्भातील मला सापडलेली माहीती पुढीलप्रमाणे आहे.

सर जॉन मार्शलनी त्यांच्या 'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' या ग्रंथात इसवीसन पुर्व 2400 मधल्या एका मुद्रेचा उल्लेख केला. ही मुद्रा 'तेलोह' येथे सापडली असुन आता ती पॅरीसमधल्या 'लुवरे' वस्तुसंग्रहालयात आहे. कै. अ. ब. वालावलकर यांनी त्यावरील चीन्हाचे वाचन 'मऋमाल' असे केले आहे. कोणत्याही 'पुरातन चीन्हांचे वाचन करणे' हे येरा गबाळ्याचे काम नाही. येथे सापडलेल्या मुद्रांवरील 'सांकेतीक चीत्रचीन्हे' यावरुन 'अशोकाचे ब्राह्मी-लेख म्हणजे भारतातील आद्यलेखन होते' या कल्पनेला तडा जातो.

'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' हा वीषय अफाट संशोधनाचा आहे. साडेचार हजार वर्षांपुर्वी मानवाच्या सांस्कृतीक कल्पनेतील सामुहीक जीवनाचे दाखले येथे मीळतात. शहर, इमारती, घरे, रस्ते, वीहीरी, स्नान गृहे, संडास, सांडपाण्याच्या नीचर्‍याची सोय, राहण्याची घरे, घराच्या जोत्यांसाठीच्या मोठ्या वीटा (10 X 20 X 40 सेंटीमीटर), भींतींसाठीच्या वीटा (7 X 14 X 28 सेंटीमीटर), वीहीरीसाठी गोलाकार साधणार्‍या त्रिकोणी वीटा, काय काय व कीती कीती दर्शन येथे मीळते. यातुन त्यावेळच्या रहीवाश्यांना साधायचा असलेला संवाद व त्यासाठी उपयोगी पडणारी भाषा सुद्धा कीती क्षमतेची असावी याचे प्रत्यंतर येते.

'सिंधी' समाजाची भाषा ही भारताची सर्वात जुनी भाषा असल्याचे यातुन कळते पण आताच्या सिंधी समाजाला स्वतःचा देश वा प्रांत सुद्धा नाही. ही खंत माझ्या काही सिंधी मीत्रांनी व्यक्त केल्याने, माहीत असलेल्या नव्या उपलब्ध माहीतीच्या आधारे काही वर्षांपुर्वी मी सिंधी-संस्कृतीच्या लीपीचा फॉण्ट बनवला होता. सिंधी संस्कृतीच्या '''लीपीच्या संस्कृतीचे''' नाव आहे 'खुदावादी'. हा प्रयत्न म्हणजे केलेल्या केवळ अभ्यासाचा तुटपुंजा व अर्धवट परीसर असल्याची मला खात्री आहे ! पण तरीही मराठी-भाषा-उच्चाराशी, 'सिंधी-भाषा-उच्चाराचा' येणारा संबंध 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या ग्रुपवर पोस्ट केलेल्या चीत्रातुन काहीसा कळेल.

आता आपण इतीहासातुन, म्हणजे अनेक इतीहासकाराच्या दृष्टीकोनातुन नीश्चीत पुराव्यासह सामोरी आलेली, काही मते पाहु.
1) ब्राम्ही लीपी मौर्यकाळात धार्मीक आणी राजकीय कामकाजासाठी वापरली जात होती.
2) गौतम बुद्धाच्या हयातीतही बुद्ध धर्मवीषयक ग्रंथातुन लेखनासाठी ब्राम्ही लीपी वापरात होती.
3) सौराष्ट्र नाणी गुप्त नाण्यांपुर्वीची आहेत व त्यातील लेखनात ब्राम्ही लीपीशी साम्य आढळते.
4) संशोधक प्रीन्सेप च्या म्हणण्यानुसार प्राचीन संस्कृत लीपी व ग्रीक वर्णमाला यात साम्य दीसुन येते.
5) जुनी ग्रीक लीपी उजवीकडुन डावीकडे लीहीली जाइ असे. त्यातील अक्षरे ब्राम्ही लीपी उलटी करुन साधलेली आहेत.
6) ब्राम्ही लीपी भारतात स्वतंत्रपणे निर्माण झाली.
7) आर्यांनी वर्णमालेचा शोध लावला नाही. ते ज्या देशात स्थायीक झाले, तीथल्या लेखनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला.
8) पाली कींवा लाट वर्णमालेवरुन देवनागरी बनवीण्यात आली.
9) भारतातील पाली कींवा लाट वर्णमाला मुळात तुराणीयन कींवा द्रवीड बोलीभाषांसाठी उपयोगात आणली जात होती.
10) तांत्रीक अक्षरचीत्रे व देवनागरी लीपी यांचा जवळचा संबंध आहे, असे मत प्रसीद्ध लीपी संशोधक शामशास्त्रींनी मांडले आहे.
11) इसवीसन पुर्व तीसर्‍या शतकात ब्राम्ही लीपी सर्वत्र प्रचारात होती त्यामुळे तीचा उगम तांत्रीक ग्रंथात शोथणे व्यर्थ आहे.
12) संशोधक डिरिंजर म्हणतात की, 'ब्राम्ही लीपी ग्रीक लीपीपासुन नीघाली हा सीद्धांत मला समाधानकारक वाटत नाही'.
13) कै. अ. ब. वालावलकर यांनी आपला 'Pre-Ashokan Brahmi' हा नीबंध 1951 साली प्रसीद्ध केला. त्यात त्यांनी ब्राम्ही ही भारतीयांची प्राथमीक लीपी नसुन त्या काळात अशोककालीन इतर अनेक भारतीय लीप्यांना समान पातळीवर आणण्यातुन उदयास आली. अशी ब्राम्ही लीपी भारतीय लिप्यांची जननी होती इतकेच नव्हे तर अभारतीय अशा सेमिटीक लीप्यांचीही जननी होती.
14) अशोकाची ब्राम्ही हे पुर्वीच्या ब्राम्ही लीपीचे विकृत रुप होय.
15) कै. अ. ब. वालावलकर म्हणतात, 'इसवीसनापुर्वीच्या दुसर्‍या शतकात ब्राम्ही वापरली जात होती आणी संस्कृतच्या पाणिनींच्या पुर्वीच ब्राम्ही अक्षरांचे पारंपारीक लेखन नीश्चीत झाले होते. याबाबतचा दाखला म्हणुन त्यांनी '''झोखा मुद्रेचा''' (इसवीसनपुर्व 2400) चा पुरावा सबळ मानला.
16) ब्राम्ही लीपीची उत्क्रांती (1) हारप्पन (इसवीसनपुर्व 2500 ते 1700), (2) अप्रकाशीत ब्राम्ही-लीपी (इसवीसनपुर्व 1700 ते 600) यापुढे कदाचीत याबाबत पुरावे मीळतील, (3) मौर्य राजवटीपुर्वीची ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 600 ते 250) याचा संबंध खरोष्टी-लीपीशी लावला जातो, (4) मौर्य राजवटीतील ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 350 ते 150) सम्राट अशोकाच्या राजवटीतील लेखन, (5) मौर्य राजवटीच्या नंतरची ब्राम्ही लीपी (इसवीसनपुर्व 150 ते सन 250).
17) माननीय संस्कृत व्याकरणकार पाणिनि यांनी संस्कृतचे व्याकरण अंदाजे इसवीसनपुर्व 400 या काळात लीहीले. म्हणजे आज आपल्याला ठाउक असलेल्या संस्कृत भाषेच्या व्याकरणा आधी ब्राम्ही लीपी वापरली जात होती.
18) पाणिनी व्याकरणाबाबतची स्वतंत्र मते त्यानंतरच्या संस्कृतच्या पतंजली, पींगल, शौनक, यस्क, वरारुची, शाकट्य, अशा अनेकांनी मांडली आहेत.  

अहो हा सारा परीसर या लेखात कशासाठी? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. 'मराठी-भाषा' हा वीषय नीघाला की बरेच वेळा तीची नीर्मीती कशी झाली?, हा वीषय नीघतो. त्यातुन '''मराठी-भाषा कशी आहे?''' हा वीषय राहतो दुर आणी '''मराठी-भाषेची-नीर्मीती कशी झाली?''' यावरच ध्यान दीले जाते. का? तर त्यातुन मराठीवर झालेला व्याकरणीय परीणाम कळेल म्हणुन !

'''मराठी-भाषेची-नीर्मीती कशी झाली?''' आणी '''मराठी-भाषा कशी आहे?''' हे दोन अतीशय भीन्न वीषय ठरतात, हे आधी नीट स्पष्ट करायचे आहे. आपण हाताळत आहोत '''मराठी-भाषा कशी आहे?''' हा वीषय. मग त्यात खुदावादी, ब्राम्ही, पाली, खरोष्टी, संस्कृत या भाषांचा सुळसुळाट हवा कशाला? जर आपल्याला मराठी ही स्वतंत्र भाषा आहे असे मान्य असेल तर मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरताच वीचार करता येतो. आजच्या वर्तमानकाळातील मराठी आधी आपण नीट स्वतंत्रपणे मांडले तर तीची नीट व्यवस्थीत अचुक ओळख होइल आणी मग 'तीची नीर्मीती कशी झाली असावी? हा वीषय हाती घेता येइल. नाहीतर '''मराठी-भाषा कशी आहे?''' या वीषयाला बगल देउन पुन्हा पुन्हा 'संस्कृत' भाषेचा जप करुन अडथळा आणु नका, हे यामागचे सांगणे आहे!

आता सांगा साडेचार हजार वर्षांपुर्वीचा इतीहास जाणुन त्याचा परीणाम तुमच्या माझ्या जीवनावर कसा व कीती झाला हे शोधणे महत्त्वाचे की आजची आपली 'मराठी' भाषा कशी आहे?, हे जाणुन घेणे महत्त्वाचे? मग मराठी-भाषेचा वीषय नीघाला की संस्कृत-भाषेशीच केवळ का बरे सोयर-सुतक पाळायचे? 'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती' येथे प्रकट झालेला स्तुप बौद्ध-धर्माची साक्ष देतो. तसेच जैन धर्मही खुप खुप पुरातन असल्याची खात्री पटते. यांचा सुद्धा उगम व वावर आपल्याच भारतात झाला. संस्कृत भाषेचे अस्तीत्व जेव्हा जेव्हा जेथे जेथे प्रगट झालेले इतीहासात दीसते तेव्हा तेव्हा व तेथे तेथे प्राकृत-भाषाही अस्तीत्वात होत्या, असे दाखले मीळतात. मग मराठी-भाषा केवळ संस्कृत मधुनच साकारली असे का म्हटले जाते? या जाहीरातीची सुरवात कोणी, केव्हा व कशी केली? हाच खरा तर संशोधनाचा वीषय ठरतो! !

'''आजची मायमराठी आणी तीच्या वीकासात येणारे अडथळे''', यांचा वीचार हाच केवळ, फक्त व नीव्वळ वीषय घेतला तर आजचे 'चुकीचे-मराठी-पुस्तकी-व्याकरण' व 'अनावश्यक-शुद्धलेकन नियम' हा सर्वात महत्त्वाचा परीसर ठरतो.

तुमच्यावर संस्कार हा तुमच्या कुटुंबाकडुन झाला. तुमच्यावर झालेल्या संस्कारात, तुमच्या जन्मापासुन अवतीभोवती असलेल्या व्यक्तींचा हात होता, असे म्हणता येते. वर्तमानकाळातील प्रत्येक कुटुंबात आजी-आजोबा, आई-बाबा, मुले अशा तीन पीढ्या असतात. या तीन्ही पीढ्यांचे 'मराठी' भीन्न असते. गेल्या प्रत्येक पीढीतील 'आजी-आजोबा' आपल्या नातवंडांना 'कायरे तुमचे हे मराठी!', 'आमच्या काळात कसे अगदी छान मराठी होते', असे सांगत आले आहेत ! ! तरीही प्रत्येक वर्तमानकाळातील तीन्ही पीढ्या, कुटुंबात 'मराठी'तुनच संवाद साधत आल्या. यातुन काय कळते? मराठी-भाषा नक्की ओघवती आहे. पण या ओघवतेपणात बदलली असली तरीही ती स्वतःचे 'मराठी' म्हणुन असलेले अस्तीत्व टीकवुन धरु शकते.

'''बदल झाला तरीही अस्तीत्व टीकुन राहते''', म्हणजे नक्की काय? याचा आपण वीचार करु. समजा जर तुम्हाला 'अ' हे अक्षर दहा भीन्न प्रकारे लीहुन हवे असेल तर काय कराल? अहो आजुबाजुच्या दहा व्यक्तींना 'अ' लीहायला सांगा ! ! प्रत्येक व्यक्तीचे हस्ताक्षर भीन्न असावे, हा काही नीयम नाही. हा काही सीद्धांत नाही. पण हे असे घडते हे मात्र खरे आहे. अहो, त्यामुळेच तर आपल्या 'सही'ने म्हणजे आपल्या हस्ताक्षराने आपल्या बँकेतील पैशांचे व्यवहार सुरक्षीतपणे हाताळले जातात ! ! हे कीत्येक वर्षे तपासुन घेतलेले अत्याधुनीक सत्य ठरते. आता समजा जर तुम्हाला 'अ' अक्षराचे 100 भीन्न प्रकार हवे असतील, तर तुम्ही काय कराल? अहो शंभर व्यक्तींकडुन 'अ' लीहुन घ्या ! ! पण या सर्व भीन्न असलेल्या रेखाटनातुन आपल्याला 'अ' हेच अक्षर कळेल. होय ना? म्हणजेच जरी 'अ' चीन्ह-लेखनाची ढब, रीत, ठेवण भीन्न असल तरी तो 'अ' ठरु शकतो. यातुन आपल्याला काय कळते? 'अ' या अक्षरात बदलप्राप्तता असते. असे असंख्य बदल झाले तरी त्या 'अ'चे 'अ' म्हणुन असलेले अस्तीत्व 'अ' गमावत नाही. यातुन आपल्याला 'अ' बाबतच्या 'स्थीरतत्त्वा'ची ओळख होउ लागते. 'अ' मध्ये लेखनात बदल झाले तरी तो 'अ' म्हणुन 'ओळखता येतो' पण 'का ओळखता येतो?' हे नक्की मांडता व सांगता येतच असे नाही, होय ना?

तसेच मराठी-भाषेचे आहे. अहीराणी, कोकणी, कोल्हापुरी, खानदेशी, वर्‍हाडी, . . . अशा अनेक बोली-भाषांची भाषा 'मराठी' आहे. 'मराठी' ही बोली नाही. का बरे या सर्व बोली-भाषा (संदर्भ-1) 'मराठी' ठरतात? तसेच ज्ञानेश्वरांपासुन तुकाराम, शीवाजी, पेशवे आणी आजचे तुम्ही-आम्ही यांची भाषा 'मराठी'च ठरते. काळाच्या ओघात 'मराठी'त झालेला बदल कळत असला तरी 'मराठी' भाषेने तीचे अस्तीत्व गमावले नाही (संदर्भ-2). का बरे हे असे 'मराठी'त घडु शकते? कोणत्याही वर्तमानकाळात असलेल्या आजी-आजोबा, आई-बाबा आणी मुले यांच्या 'मराठी'तील भीन्नता आपणास जाणवते. पण तरीही 'मराठी' तीचे अस्तीत्व गमावत नाही (संदर्भ-3). हे असे 'मराठी'त घडते. हे संस्कृत-भाषेत घडु शकत नाही. कारण पाणीनींनी संस्कृत भाषेला तीच्या व्याकरणातुन स्थीर, अचल, बंदीस्त बनवले आहे. मग '''मराठी भाषेत संस्कृत भाषेतील बरेच शब्द जसेच्या तसे स्वीकारले गेले आहेत''' हा वीचारच त्याज्य म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचे तर मुर्खपणाचा ठरतो ना?

'मोहेन जो दडो आणी सिंधु संस्कृती'पासुनच्या इतीहासात मानवासाठीचा भाषा हा वीषय कसा, कुठे, कीती बदलत गेला याचा अभ्यास होत आहे. यातुन केव्हा व कशी मराठीची स्थापना झाली? व आजची मराठी बनली? या वीषयापेक्षा आजची 'मराठी' म्हणजेच आपल्याला ज्ञात असलेल्या इतीहासातील अस्तीत्व कायम ठेवलेली 'मराठी' कशी आहे? याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

आपण जर हा अभ्यास पुर्ण केला तर मराठीतील 'बदलप्राप्त गुणधर्मांच्या आधारे' इतीहासाचा मागोवा घेत 'मराठी'च्या उगमस्थानाकडे पोचण्याची शक्यता कदाचीत निर्माण होइल. संस्कृत-भाषेचा याच्याशी काडीमात्र संबंध नाही, हेही यातुन कळायला सुरवात होते.

मग संस्कृत-भाषा जगातील सर्व भाषांची जननी असो वा नसो, काय फरक पडतो? संस्कृत-भाषा देव-भाषा असो वा नसो, काय फरक पडतो? आपल्याला आधी आजची, आपली, आणी महाराष्ट्रात आज वावरणारी 'मराठी' कशी आहे? हे माहीत करुन घ्यायला हवे आहे. यासाठी ''संदर्भ-1-बोली'', ''संदर्भ-2-काळाचा ओघ'', ''संदर्भ-3-तीन पीढ्या'' अशा ओघवत्या परीस्थीतीतुन 'मराठी' तीचे अस्तीत्व कायम टीकवुन का व कशी राहु शकते ते शोधणे गरजेचे ठरते. संस्कृतसारख्या बंदीस्त व कुपमंडीत भाषेला याचे ज्ञान कुठुन मीळणार? संस्कृत भाषेकडुन ही अपेक्षा करणे म्हणे 'आत्याबाईंना मीशा असत्या तर?' असे म्हटल्यासारखे होईल. कदाचीत हे उदाहरण बर्‍याच जणांना आवडणार नाही. पण तुलना करताना त्याचे अधीक स्पष्टीकरण न देता वीषयाच्या गांभीर्यापर्यंत पोचायचे असेल तर हेच उदाहरण योग्य ठरेल, असे मला वाटते.

'मराठी'तील बदलप्राप्तता शोधणे म्हणजेच मराठीतील '''स्थीरतत्त्वे'' शोधणे होय. गेल्या तीस वर्षांच्या अथक प्रयत्नातुन मराठीची '''स्थीरतत्त्वे'' शोधण्याचे काम केले आहे. आजच्या ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचा'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांचा'' कळत नकळत झालेला समाजावरील परीणाम 'मराठी'बाबतची चुकीची गृहीते मनामनात ठसवीण्यात झाला आहे. त्यातुन उगाचच असंख्य प्रश्न निर्माण झाल्यासारखे वाटतात. पण जर आपण आजच्या ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाचा'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांचा'' त्याग केला आणी मराठीच्या '''शास्त्रीय, नैसर्गीक, क्षेष्ठ, सक्षम, कुशल, सर्वसमावेशक, उपजत आणी मुलभुत'''पणाचा स्वीकार केला तर मराठीला संस्कृतसारखा वेश देण्याच्या प्रयत्नातुन निर्माण झालेले असंख्य प्रश्न पुर्णपणे व कायमचे नेस्तनाबुत होतील.

'''मराठी हाजीर हो ऽऽऽ - भाग 7''' हा आहे संस्कृत व मराठी भाषा संदर्भातील '''आजच्या संस्कृत-प्रचुर ''चुकीच्या-पुस्तकी-व्याकरणाला'' आणी ''अनावश्यक-शुद्धलेखन-नीयमांना'' कधीही मांडता न येणारी मायमराठीतील '''स्थीरतत्त्वे संकल्पना''' याबाबतचा ठोस पुरावा.
यातुन '''मराठीतील उपजत, मुलभुत, शास्त्रीय व नैसर्गीकपणाला साजेलसे व्याकरण मराठीने मराठीचा मराठीसाठी मराठीपणातुन मराठीपुरतेच लिहीणे आवश्यक आहे''' या वीचारांना नीश्चीतता मीळते.
क्रमाक्रमाने असंख्य पुरावे सादर करत आहे.

या अभियानाचे नाव आहे '''मराठी हाजीर हो ऽऽऽ'''
हा उपक्रम 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुक ग्रुपवर सादर होत आहे.
सर्व मराठी प्रेमींनी यात जरुर सामील व्हावे.
त्यासाठी 'सर्वसमावेशक मराठी' या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/  ग्रुपवर 'अवघा मराठी तीतुका मेळवुया, मराठमोळ्या मायमराठीला स्वतंत्र करुया' यासाठी सामील व्हा.

संपर्क साधा – शुभानन गांगल
मोबाइल – 9833102727
इमेल – shubhanan.gangal@gmail.com

Wednesday, 2 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 41 – अमृताच्या पैजा जींकणारी मराठी भाषा म्हणजे नक्की काय?



युनिकोड ते साऊंडकोड लेख 41अमृताच्या पैजा जींकणारी मराठी भाषा म्हणजे नक्की काय?

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

मराठीच्या दैदीप्यमान अद्वितीय नैसर्गिक शास्त्रीयतेबाबत सगळेच आहेत उदासीन !
पुढील मजकुर वाचण्यापुर्वी जवळ ठेवा, चार कीलो क्रोसीन, पाच कीलो अॅनासीन ! !

1.         मानवाच्या भाषांची प्रगती ही मानवाला अवगत झालेल्या भाषा-माध्यमांनुसार घडली.
2.         भाषा माध्यमांची प्रगती आणी मानवाची प्रगती हे एकमेकांना पुरक वीषय आहेत.
3.         साडेतीन हजार वर्षांपुर्वी नीबीड अरण्यांच्या काळात मानवाला भाषेसाठी केवळ ध्वनी हे माध्यम अवगत होते.
4.         त्यावेळी ध्वनीतील जास्तीतजास्त गुणधर्मांचा वापर करुन भारताने संस्कृत भाषा बनवली.
5.         निव्वळ, केवळ, फक्त ध्वनी हेच माध्यम भाषेला अवगत असताना त्यात भाषेच्या उच्चारातुन गद्य, पद्य व संगीत यांच्यातील भीन्नता कळणे, जपणे, वापरणे हे घडत होते का?
6.         सामान्य भाषेतुन व्यवहार साधणे म्हणजे गद्य असे मानले जात असेल का?
7.         'ज्ञान' या नावाने संग्रह करत, गुरुने शिष्याला सांगण्यासाठी, पुढील पीढीला पाठ करुन, जतन करता येइल, अशा रचना म्हणजे काव्य ठरत होते का?
8.         या लयतालवीचारांत घोळलेल्या भाषेतील रचनांना पाठ करणे सोपे पडत असेल का?
9.         प्रत्येक मानवाला संगीत उमगते पण गाता येतेच असे नाही, हा नीयम त्यावेळच्या मानवांनाही लागु पडत असेल का?
10.      जर तसे असेल तर घोकंपट्टी करुन 'ज्ञान' स्मृतीत साठवण्यासाठी 'पद्य' स्वरुपाच्या भाषा-अवीर्भावाचा वापर करुन ते साठवण्याची गरज मानवाला भासली असेल का?
11.      ज्या काळात भाषेला 'कागद' नावाचे माध्यम उपलब्ध नव्हते, केवळ 'ध्वनी' हेच भाषा-माध्यम होते, तेव्हा त्या समाजाला 'केवळ ध्वनीतुन भाषेच्या वावरण्यातील मर्यादा' लक्षात आल्या असतील का?
12.      की ध्वनी माध्यमातील जास्तीतजास्त शक्यता भाषेत वापरता आल्याच्या आनंदात वीकासाच्या दीशा खुंटल्या गेल्या असतील?
13.      साडेतीन हजार वर्षांपुर्वी नीबीड अरण्यांच्या काळात केवळ ध्वनी हेच भाषा-माध्यम अवगत असताना भारतात संस्कृत भाषेने वेद-उपनिषदे घडवली.
14.      पण त्यानंतरचे सर्व शोध भारतात नव्हे तर युरोपात लागले, का बरे असे घडले?
15.      भारतातील बुद्धी कोमात गेली होती? भारतीय भाषा निष्क्रीय बनल्या होत्या? की आणखी काही कारणे?
16.      म्हणजे भाषा उत्कृष्ठ असणे याचबरोबर ती ओघवती असणे हे यासाठी कीती महत्त्वाचे ठरते?
17.      बुद्धीला अधीक चालना मीळुन नवनवीन शोध भाषेतुन येण्यासाठी भाषा ओघवती असणे गरजेचे ठरते का?
18.      संस्कृत व मराठी यात कोणती भाषा मुक्तपणे ओघवती व कोणती कुपमंडीत ठरते?
19.      संस्कृत भाषेचा मानसीक पांगुळगाडा घेतल्याने व 'सर्व ज्ञान वेदात आहे' अशा घोषवाक्याने, नव्या नव्या संशोधनाची आबाळ भारतात झाली असण्याची शक्यता कीती?
20.      भाषेतल्या तृटींचा परीणाम बुद्धीला वेसण घालतो की नाही?
21.      नव्या संशोधनाला जन्म देण्याचे कार्य भाषेच्या शास्त्रशुद्धतेवर अवलंबुन असते का?
22.      तृटी असलेल्या भाषेतुन होणार्‍या संशोधनांची झेप कोणत्या कुंपणापर्यंत पोचेल?
23.      भाषेची माध्यमे यात 'ध्वनी व उच्चार', 'कागद व चीन्हे', 'संगणक व फॉण्ट' अशी संयुगे असतात.
24.      भाषेच्या 'उपलब्धमाध्यमा'ला 'ध्वनी-कागद-संगणक' याऐवजी आधुनीक काळात 'उच्चार-चीन्हे-फॉण्ट' असे म्हणता येते.
25.      भाषेची 'उपलब्ध-माध्यमे' ही बुद्धीतुन अवगत होणार्‍या विचार-भावनांची नीव्वळ वहाने ठरतात.
26.      जर भाषेच्या 'उपलब्ध-माध्यमां'ची सवय लावुन आपण प्रस्थापीत चाकोरीतुनच वाटचाल करत राहीलो तर बुद्धीला त्यांची झापडे लावल्यासारखी ठरतात का?
27.      बुद्धीला काय हवे आहे त्यासाठी भाषेच्या 'उपलब्ध-माध्यमां'चा कसा, कोणता, कुठे व कीती उपयोग करायचा हे ठरवता आले तर प्रस्थापीत चाकोरी-बद्धपणातील दोष लक्षात येतील का?
28.      नाहीतर त्याच दोषांच्या प्रवाहात आपण आजन्म वहात राहतो व आयुष्य भाषांतील चुकांच्या कुबड्या घेतच संपवतो, असे घडते का?
29.      अंदाजे पंचवीस वर्षांपुर्वी मी 'भाषेची ध्वनी-वृत्ती', 'भाषेची कागदी-वृत्ती' आणी 'भाषेची संगणकीय वृत्ती' असे तीन वीषय नीर्माण केले.
30.      ध्वनी-वृत्ती ही भाषेच्या उच्चारातुन, कागदी-वृत्ती ही भाषेतील चीन्हांतुन आणी संगणकीय-वृत्ती ही भाषेच्या फॉण्ट मधुन परीवर्तीत होते.
31.      'चीन्हे व फॉण्ट' यातुन भाषेतल्या उच्चारांची योग्यता पुर्णपणे पाळली जात नसल्याने भाषेच्या गळ्यात जणु लोढणे घातल्यासारखे होते.
32.      मानवी भाषांसाठीचा भाषा-जागतीकीकरणाचा अभ्यास येथुन सुरु होतो असे मला वाटते.
33.      त्यातुन अनेक भाषांबाबतचा नव्याने प्रत्यय, परीचय, साक्षात्कार झाल्याचा अनुभव येतो.
34.      जसे फिजीक्सला अणु-रेणु ही सुक्ष्मतम अंश गवसले व मानवाने प्रगतीची शीखरे गाठली तसेच ध्वनीतील नैसर्गिक ठरणारे भाषा अणु-रेणु असतात का?
35.      भाषेत वापरल्या जाणार्‍या सुक्ष्म-ध्वनीची ओळख व्याख्यात्मकपणे अणु-रेणु अशी करणे कोणत्या भाषेला शक्य आहे?
36.      जमीन, पाणी व आकाश ही प्रवासाची माध्यमे आहेत तशीच ध्वनी, कागद व संगणक ही अत्याधुनीक भाषा माध्यमे ठरतात.
37.      तृटी असलेल्या भाषेतुन बुद्धीला करता येणारा प्रवास आणी शास्त्रीय-नैसर्गिक असलेल्या भाषेतुन बुद्धीला करता येणारा प्रवास यात 'बैलगाडी' ते 'जेट' असा फरक असतो का?
38.      संगणकाच्या युगात इंग्रजी-भाषा कोणत्या क्षीतीजापर्यंत झेप घेउ शकेल?
39.      संगणकाच्या युगात इंग्रजी भाषा मानवाच्या वीकासाला मर्यादा घालत आहे, असे वाटते का?
40.      आता यापुढे जगावर राज्य करणे हे शस्त्रे-अस्त्रे करणार नसुन भाषा करणार आहे, असे तुम्हाला वाटते का?
41.      मराठी भाषेतला उपजत मुलभुत शास्त्रीय व नैसर्गिक पणाला मराठी भाषा वापरत असलेल्या देवनागरी चीन्हांमुळे कोणत्या मर्यादा पडत आहेत?
42.      भाषांच्या जागतीकीकरणात मराठी भा सर्वसमावेशकाची भुमीका नीभावु शकेल का?
43.      त्यासाठी आजच्या मायमराठीच्या देवनागरी अक्षर-चीन्हांमध्ये कोणता बदल आवश्यक आहे व का?

संशोधनातुन पुर्ण केलेल्या वीचारांना शब्दांकन देत काही मजकुर, फेसबुकवरील मर्यादा लक्षात घेऊन, पोस्ट करत आहे.

या लेखातील वीचारांना अंक दीले आहेत. त्यामुळे कोणत्या मुद्यावर चर्चा करायची आहे ते सांगता येइल.

ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी जरुर मोबाइलवर संपर्क साधावा.

मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र कार्य करण्यासाठी फेसबुकच्या ग्रुपवर सामिल व्हा.





आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल Shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com